Thursday, 24 March 2022

 

शट-डाऊन: अर्थ आणि अन्वयार्थ

 

“शट-डाऊन” म्हणजे एखादी प्रक्रिया / कारभार बंद ठेवणे. उद्योग धंद्यात (विशेषत: मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री मध्ये) काम करणार्‍यांना “शट-डाऊन” हा शब्द परिचयाचा आहे. वर्षातून एखादं वेळा मेंटेनन्स साठी पूर्ण किंवा काही प्रमाणात उत्पादन प्रक्रिया खंडित केली जाते त्याला “शट-डाऊन” (किंवा Schedule Outage) असे म्हटले जाते. अर्थात उत्पादन बंद करण्याची ही पद्धत काही निश्चित ध्येये ठेवून अतिशय काटेकोर नियोजन करूनच केली जाते. IT मधेही असे “शट-डाऊन” करण्याची वेळ येते. मॅन्युफॅक्चरींग मध्ये किंवा IT मध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास अपवादा‍त्मक परिस्थितीतसुद्धा असे  “शट-डाऊन” करावे लागते. पण आणीबाणीच्या परिस्थितीत केलेले “शट-डाऊन” सुद्धा विशिष्ट प्रक्रियेनुसारच केले जाते.

आता समजा, या क्षेत्रातील मंडळींपैकी कुणाला संपूर्ण देशभर “शट-डाऊन” करायला सांगितला तर ते कसे करतील? मॅन्युफॅक्चरींग मधील माणूस प्रथम प्रत्येक प्रक्रियेच्या (Process) / खात्याच्या प्रमुखाशी संपर्क करून त्यांना संभाव्य “शट-डाऊन” ची कल्पना देऊन सर्वांबरोबर चर्चा करेल. कोणत्या प्रक्रिया पूर्ण बंद करावयाच्या कोणत्या काही प्रमाणात करावयाच्या आणि कोणत्या प्रक्रिया चालू ठेवणे भाग आहे हे ठरवले जाईल. प्रत्येक प्रमुखाकडून त्यांना येणार्‍या संभाव्य अडचणी, त्यावरचे उपाय, याची यादी केली जाईल. त्यांना कोणती मदत हवी आहे ती कशी पुरवली जाईल हे ठरवले जाईल. कोणी कधी, कसे आणि कोणाच्या संपर्कात राहायचे हे आणि सर्व परिस्थितीची माहिती सर्वांपर्यंत कशी, कधी आणि कोणाकडून प्रसारित केली जाईल हे नक्की केले जाईल. आणि मुख्य म्हणजे पुन्हा सर्व चालू करताना कोणत्या क्रमाने, कधी आणि कसे चालू करावयाचे याचा आराखडा निश्चित होईल.

IT क्षेत्रातील माणूसही असेच करेल. मा‍झ्या मते त्याची एक स्टेप आणखी असेल. ती म्हणजे, “शट-डाऊन” नंतर एक सर्व संबंधितांची (Stakeholders) मिटिंग घेतली जाईल (GO-NoGO निर्णय घेण्यासाठी). म्हणजे आपण केलेले “शट-डाऊन” योग्य झाले आहे ना? त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे की काही सुधारणा करणे आवश्यक आहे? का पुन्हा Roll Back करावयाचे? याचा निर्णय घेण्यासाठी. (अर्थात Roll Back चा आराखडा आधीच तयार ठेवलेला असेल).

काय आहे, शेवटी माणसाची निर्णयक्षमता ही त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर आणि त्याला असलेला पूर्वानुभव यावर अवलंबून असते.

आता तुम्ही चहाची टपरी बंद होताना पाहीली आहे? तो टपरीवाला आजूबाजूच्या दुकानांचा (भेळवाला, इडलीवाला ) कल बघतो आणि तोच निर्णय घेतो की तासाभरात टपरी बंद. पोऱ्याला विचारात बसत नाही. फक्त ऑर्डर देतो की आवरायला घे. झाल....

दोन वर्षापूर्वी उपाशीपोटी आपल्या कच्या-बच्यांसह शेकडो मैल तंगडतोड करणाऱ्या मजूरांचे तांडे पाहून हेच मनात आल होत. अस कोणी कस काय करू शकत?

 

सौर दिनांक - चैत्र ३,शके १९४४

Thursday, 31 May 2012

(अव)चिन्हांकित रुपया !!



हुश्श !!! अखेर भारतीय अर्थव्यवस्थेच्या ढासळण्याचे आणि रुपयाच्या अवमुल्यानाचे नेमके कारण सापडले. सामान्य जनतेपासून सरकार पर्यंत अर्थव्यवस्थेच्या काळजीने चिंतीत होतेच (अगदी अर्थमंत्री स्वतः काळजीचे कारण नाही असे बाईट सर्व channel वर जरी देत असले तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसून येतेच.). सरकारने सर्व पातळीवर उपाययोजना करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा उपाय काही सापडत नव्हता. आणि सापडणार तरी कसा?

अशा अत्यंत कठीण परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी अत्यंत सक्षम आणि बुद्धिमान तज्ञ मंडळी सरकारकडे हवीत कि नाही? पण सरकार काय अथवा रिझर्व बँकेकडे काय खोगीरभारती कोणाची आहे तर IIM, London School of Economics, अथवा गेलाबाजार IIT सारख्या सुमार संस्थेतून शिक्षण घेऊन स्वताला तज्ञ समजणाऱ्या मंडळींची. बर या मंडळींचे शिक्षण कशात तर अर्थशास्त्र, पदार्थाविज्ञान, माहितीतंत्रज्ञान अशा फुटकळ विषयात. अशा कालबाह्य झालेल्या विषयात चार धुळाक्षरे गिरवून तज्ञ म्हणून मिरवणाऱ्या मंडळीना का हि समस्या सुटणार? बरे, हि अशी मंडळीही संख्येने अगदी मोजकीच (म्हणूनच फावते बहुतेक या लोकांचे.)

पण अशी जटील समस्या सोडवण्यासाठी तशीच मात्तब्बर आणि विद्द्वान मंडळी हवीत हे सरकारला कधी उमजणार? त्यासाठी हवीत ज्योतिषशास्त्र(?), वास्तुशास्त्र (?) अशा अतिआधुनिक विषयात पारंगत असलेली तज्ञ मंडळी.  बरे, यांची सख्याही आजकाल बरीच आहे (अहो एकेका गल्लीत ५-६ तज्ञ आहेत.

बघा, जे IIM, अथवा London School of Economics मधे फुटकळ शिक्षण घेऊन आलेल्या आणि स्वताला तज्ञ मंडळीना जे जमले नाही ते वास्तुशास्त्रा सारख्या अत्याधुनिक शास्त्रात पारंगत असलेल्या एका विद्वान व्यक्तींने केले.

गोहत्तीस्थित एका वास्तुतज्ञांने रुपयाच्या अवामुल्यानाचे नेमके करणा शोधून त्यावर उपायसुद्धा सुचवला आहे. तोही अगदी सोपा. बघा आम्ही म्हणत नव्हतो कि IIM, London School of Economics मधे शिकलेल्या येऱ्या-गबाळांचे हे काम नोहे.

या सगळ्या समस्येसं कारण आहे ते रुपयाचे नवीन चिन्ह ! या वास्तुतज्ञांच्या मते हे अपवित्र (An inauspicious symbol) चिन्हचं रुपयाच्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे (स्त्रोत : Hindustan Times 31st May 2012, page 10). 
कारण या चीन्हातील खालची आडवी रेघ रुपयाचा (आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेचा) गळा घोटते आहे म्हणे! बघा बघा... एवढे सोप्पे कारण पण नाही न मिळाले त्या तुमच्या IIT, IIM, अथवा London School of Economics मधील विद्वानांना....

या वास्तुतज्ञांनी पुरावे तरी किती भक्कम दिलेत म्हणता? अहो हे चिन्ह (चिन्ह कसले, अवचिन्हचं ते !) नसताना २००९ च्या जागतिक अर्थासंकटातून आपण सहीसलामत सुटलोच कि नाही? पण २०१० मधे हे चिन्ह स्वीकारले गेले आणि गेल्या जानेवारी पासून ते अमलात आणले गेले (अगदी नोटांवर छापले गेले) आणि तिथूनच अर्थाव्यवस्था ढासळायला सुरवात झाली ना... आणखी कसला पुरावा हवा?

या चिन्हाची (कसले, अवचिन्हाची) माहिती काढली तर असे कळले कि सदर चिन्ह हे D Udayakumar या IIT मधील प्राध्यापकाने डिझाईन केले आहे. (बघा बघा !!! हि व्यक्ती कोण तर IIT मधलीच.... हा काय योगायोग म्हणायचा? आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो कि हे IIt IIMवाले..... पण लक्षात कोण घेतो?)

आता तरी सरकारने शहाणे होऊन या IIT, IIM अशा सुमार संस्थांमधील अर्थशास्त्र, पदार्थाविज्ञान, माहितीतंत्रज्ञान अशा कालबाह्य विषयातील तथाकथित विद्वानांना बाजूला सारून या देशातील ज्योतिष, वास्तुशास्त्र, अशा अत्याधुनिक विषयातील तज्ञ मंडळींची समिती नेमून एकूणच देशाच्या विदारक स्थितीची नेमकी करणे व उपाय सुचवण्यास सांगावे.

अर्थात समितीचा अहवाल हा आमच्या अटकळीप्रमाणेच असेल यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. वानगी दाखल काही उदाहरणे अशी –
१)  देशाच्या राष्ट्रध्वजाचा आकार, रंग (विशेषतः हिरवा) आणि त्यावरील चिन्ह हि देशास व देशाच्या ढासळत्या परिस्थितीस कारणीभूत आहेत. देशाच्या कुंडलीचा विचार करता भगवा रंग हा "भाग्य-रंग" ठरावा. तसेच ध्वजाचा त्रिकोणसदृश्य आकार देशाच्या भाग्योदायास कारणीभूत ठरेल.
२)   अमुक-तमुक शास्त्राप्रमाणे देशाचे या आद्याक्षरावरून सुरु होणारे नाव देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आसून हि या आद्याक्षार्पासून सुरु होणारे अनुनासिक नाव देशास प्रगतीपथावर नेईल.

आम्हास खात्री आहे कि हि समिती राष्ट्राध्वजापासून राष्ट्रगीता पर्यंत अनेक उपाय सुचवून देशात क्रांतीकारक बदल घडवून आणेल.

असो! आता काही नतद्रष्ट मंडळी अशी शंका काढतात कि जर एक आडवी रेघ रुपयाचा गळा घोटते तर डॉलर् मधल्या उभ्या रेषेने आतापर्यंत डॉलरला उभे का चिरले नाही? पौंडाच्या पोटात खुपसलेल्या आडव्या रेषेने पौंडाचा कोथळा बाहेर का काढीला नाही?

(नतद्रष्टनो, भलत्या शंका काढण्याचे काम नाही. ज्योतिष, वास्तुशास्त्र, अशा अत्याधुनिक शास्त्रात सगळ्या प्रश्नांना उत्तरे नसतात कारण ती शास्त्र आहेत. कळले!!!!)

Sunday, 10 July 2011

एक पाऊस कधीचा....

  
ऄक पाऊस कधीचा 
पाऊस हा खरतर कवींचा सगळ्यात आवडता ऋतु. म्हणूनच पावसावर अनेक कविता आजपर्यंत मराठी साहित्यात झाल्या आहेत आणि या पुढेही होतील. साहित्यात कविता आणि पावसाचे हे नाते अगदी साहित्याच्या आरंभापासूनचे. या नात्याची आपल्याला पहिली ओळख होते ती लहानपणी ऐकलेल्या बडबडगीतातून, "ये रे ये रे पावसा"  पासुनाच. पुढे "भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल काय " चा टप्पा ओलांडत तारुण्याच्या वाटेवर आपणही जलधारांनी अंगे भीजल्या "ऐश्या ललनांची" स्वप्ने पाहत मोठे होतो. पावसाचे असे अनेक आविष्कार आपण कवितेतून अनुभवलेले असतात. आपल्यासाठी तरी कविता आणि पावसाचे हे नाते ऐवढया पुरतेच असते.

पण  कल्पना करा कि हि कविता पावसाच्या प्रेमात पडली आणि पावसानेही तिला प्रतिसाद दिला तर? कल्पना तर रोम‍ॅटिक आहे न? पण मग कसे असेल त्यांचे हे नाते? आणि काय होईल त्यांच्या या प्रेमकहाणीचे?

याच  नात्याचा काव्यमय आणि संगीतमय प्रवास म्हणजे सुरभी निर्मित "एक पाऊस कधीचा".

कविता आणि पावसाचे प्रेमात पडणे, प्रथम अव्यक्त पण नंतर ऐका टप्प्यावर एकमेकांकडे व्यक्त होणे, नंतरचा अपरिहार्य दुरावा आणि पुन्हा पुनर्मिलन असा हा त्यांचा नात्याचा प्रवास त्यातील कंगो-यांसह संहितेत अप्रतिम पणे शब्दबद्ध केला आहे स्पृहा जोशी हिने. तर हा अनुभव काव्यमय आणि संगीतमय झाला आहे तरूण संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी संगीतबध्द केलेल्या अनेक मात्तबर कवींच्या कवीतांनी.

आलाप भागवत, यशोदा बुधकर यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सदानंद डबीर, ना धो महानोर, स्पृहा जोशी यांच्या कवितेतून आणि स्पृहा जोशी व सुबोध खानोलकर यांच्या निवेदनातुन हि आगळी वेगळी प्रेमकहाणी आपल्यापुढे साकारत जाते. अतिशय सुंदर संहिता, सुरेख निवेदन अप्रतिम गायन आणि संगीत याने नटलेला हा कार्यक्रम एकदा तरी अनुभवावा. 

या कार्यक्रच्या निमित्ताने प्रकर्षाने आठवण झाली ती आणखी ऐका कलाकृतीची. ती म्हणजे विक्रम भागवत लिखित "ऐक लफडे न विसरता येणारे" या नाटकाची. या नाटकाचा उल्लेख मुद्दाम करण्याचा उद्देश या दोन कलाकृतीत तुलना करण्याचा अजिबात नाही. पण त्यातील साम्यस्थळे व शक्तीस्थळे शोधण्याचा एक प्रयत्न.

या दोन्ही कलाकृतींचे कल्पनाबीज तसे साधारण एकच. दोन्हींचा प्रवास प्रेम - विरह - पूर्नभेट असाच असला तरी प्रवासाच्या वाटा मात्र वेगळ्या. या वाटेवर विक्रम भागवतांना भेटली दोन मानवी पात्रे  रंगा आणि  मनस्विनी त्यांच्या स्वभावविशेष व गुणा-अवगुणांसकट. त्याच्या नातेसबंधांचा वेध घेत भागवतांनी हा प्रवास नाट्यमय केला तर स्पृहाने पाऊस आणि कविता हि अशरीर प्रतीके घेत काव्यमय व संगीतमय प्रवास घडविला. दोन्हींमध्ये तीच उत्कटता, आणि तोच अपरिहार्य विरह. पण अनुभूती मात्र वेगवेगळी. नाटकात मानवी विकारांसह शारीर पातळीवर जाणारी तर एक पाऊस कधीचा मध्ये प्रतिकांमधुन मानवी विकारांचा आभास निर्माण करणारी.
नाटकातील मानवी पात्रांचा प्रवास त्यांच्या प्रारब्धानुसार नियतीने ठरविलेला तर "एक पाऊस कधीचा" मध्ये तो निसर्गनियमाने ऋतुचक्रात बांधलेला. पण दोन्ही कलाकृती अत्यंत तरल अनुभव देणा-या .  एकाच कल्पनेवर
दोन ताकदीचे कलाकार (एक लेखक तर एक कवियत्री) दोन वेगवेगळ्या फॉर्मसं मधे अत्यंत सुंदर कलाकृती कशा साकारू शकतात याचे हे सुरेख उदाहरण. एकाच कल्पनेचे हे दोन अप्रतिम अविष्कार.

असो. हे झाले संहितेबद्दल. आता थोडे सादरीकरणा बद्दल. आलाप, यशोदा, मयुरेश, स्पृहा, आणि सुबोध या सर्व  मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.   आलाप - यशोदा - मयुरेश या त्रवीनी आपली ताकद "एक लफडे" च्या निमित्ताने यापूर्वीच  दाखविली आहे. एक पाऊस मधे त्यांना मिळालेल्या संधीचे त्यानी सोने केले आहे. यातील प्रत्येक गीत त्यानी जबरदस्त ताकदीनी सादर केली आहेतच पण प्रत्येकानी किमान दोन गाण्यांवर आपली मोहोर उठविली आहे.

मयुरेशचे संगीत हा या कार्यक्रमाचा प्लस पांईंट ठरला आहे. या निमित्ताने मात्तबर कविंच्या कधीही संगीतबद्ध न झालेल्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतात. त्या बद्दल मयुरेशचे  विशेष अभिनंदन करावयास हवे. संपूर्ण कार्यक्रमात एकच परिचित गाणे आहे ते म्हणजे "पाऊस आला वारा आला". पण तेही पूर्णपणे नवीन चाल घेऊन.

स्पृहाने  यापूर्वी अभिनेत्री म्हणून आंतरमहाविद्यालय स्पर्धेपासूनच आपले वेगळेपण दाखविले आहे. आता एक पाऊस कधीचा मधून ती कवियत्री, लेखिका, आणि निवेदिका म्हणून आपली छाप पांडली आहे यात शंकाच नाही. तिला निवेदनात सुबोधने सुरेख साथ दिली आहे.

असा कार्यक्रम सादर करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल निर्माता म्हणून आलापचे विशेष कौतुक करायला हवे. परिचित आणि त्यातही खास करून लोकप्रिय गाणी सादर करणारे मराठी वाद्यवृंद शेकड्यानी आहेत. पण उत्तोमोत्तम कविता निवडून त्या एका विशिष्ठ सूत्रात गुंफत त्या खास संगीतबध्द करून त्याचा नजराणा रसिकांना देण्याचा धाडसी प्रयोग "एक पाऊस कधीचा" मधे त्याने  केल्याबद्दल आलाप्चे कौतुक आणि अभिनंदन.
हा प्रयोग करण्यासाठी त्याला साथ द्यायला टीम सुध्दा जबरदस्त मिळाली आहे हे त्याचे भाग्याच म्हणावे लागेल. कविता आणि पाऊस यांच्या प्रेमाकाहाणीची संकल्पना शब्दबध्द करणारी लेखिका स्पृहा, तसेच हि संकल्पना निवेदनातून सादर करणारे निवेदक स्पृहा आणि सुबोध, या सर्व कवितांना संगीतसाज चढविणारा गुणी संगीतकार मयुरेश, आणि गायक म्हणून यशोदा व स्वत: आलाप. एक मस्त टीम जमली आहे. या धाडसी टीमला सर्व काव्याप्रेमी रसिकांनी भरभरून पाठिंबा द्यावा.

एक  कविता पावसाची.....
एक  पाऊस कवितेचा.....
एक  प्रवास त्यांच्या प्रेम कहाणीचा....
एक  पाऊस कधीचा......
------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, 31 May 2011

Osama’s operation and Indian Media


Four weeks back Osama was killed in Pakistan. Everything was as expected. It was expected that the US will act as soon as Osama is traced. At the same time, it was very well expected that Osama would be traced nowhere else but in Pakistan. He had no other alternative left but to hide in Pak. As expected Pak Govt (in turn ISI and military) protected him for the last couple of years.

 

India is claiming for the past several decades that Pak helps extremists at all levels. We are deeply concern about the Pak’s protection to all that are involved in extremist activities in India and abroad. We are more than sure that Dawood and his criminal gang are staying in Pak and so Osama and his extremists. That is our national concern.

 

Our media (that we refer to as one of the pillars of democracy and expect it to be aligned with national interest) failed miserably to highlight our national concern while covering the Osama’s death. For us, who and how Osama got killed is not as important as where he was killed. Even he would have died due to kidney filature it would have more important where he died and not how.

It was necessary to hammer his presence in Pak while covering his death. However, from newspaper headlines, it seems that our print media was not at all concerned about the same. Instead, they were gone with jazzy, glittery and catchy headlines. Except for Hindustan Times and Asian Age, no other newspaper mentioned it clearly and neatly. Marathi newspapers seem to be totally unaware of their responsibilities. Let's have a look at some of the headlines of English and Marathi newspapers in Mumbai. 

 

English newspapers:

 

Indian Exp – Osama is dead

(Thanks a lot Mr. Editor for conveying us this news which we heard and seen on-air at least 12 hrs back...)

Mid day – Osama Gone But when Mumbai will get justice?

DNA – Obama bins laden

(Is this a time to play with words? Serious readers will bins DNA soon)

Mumbai mirror – Terror loses its face

H T – US Kills Osama in Pakistan

Asian Age – US kills laden in (you know it) Pakistan

Times of India – US Kills Osama, Blows pak cover

Though the ToI headline highlights the point I feel it is in too literary fashion. “Blows Pak cover” may be interpreted in many ways. The headline would have more clear and understandable even to the 9th-grade student. We should appreciate HT and Asian Age for their concise wording. Asian Age added our concern more confidently (by putting “you know it”). It sounds “We all knew it !!!”.

Now, look at Marathi headlines which are more disgusting. All sounds like a promo of an upcoming TV series or c grade movie title.

Lokmat – Ladencha Khatma

Sakal Pune - Ladencha Khatma

Prahar – Shikar – Akher Osamala Amerikene tipale

Pudhari – Ladencha Khatma

Samna – Krur-karma ladencha khatma

Loksatta – Ameriki Hallyat Laden Thar

 

Nobody mentioned his existence in Pak.

 

And now its governments turn to show how lethargic our system is. Our list of “most wanted” is not updated. It is pathetic. Are we serious enough about terrorism? Or our politicians have more important things to handle (such as fund collection thru various scams, mafias, politicizing issues like renaming railway station etc.).

 

I wonder whether even god (if exists) can save this country.....