पाऊस हा खरतर कवींचा सगळ्यात आवडता ऋतु. म्हणूनच पावसावर अनेक कविता आजपर्यंत मराठी साहित्यात झाल्या आहेत आणि या पुढेही होतील. साहित्यात कविता आणि पावसाचे हे नाते अगदी साहित्याच्या आरंभापासूनचे. या नात्याची आपल्याला पहिली ओळख होते ती लहानपणी ऐकलेल्या बडबडगीतातून, "ये रे ये रे पावसा" पासुनाच. पुढे "भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल काय " चा टप्पा ओलांडत तारुण्याच्या वाटेवर आपणही जलधारांनी अंगे भीजल्या "ऐश्या ललनांची" स्वप्ने पाहत मोठे होतो. पावसाचे असे अनेक आविष्कार आपण कवितेतून अनुभवलेले असतात. आपल्यासाठी तरी कविता आणि पावसाचे हे नाते ऐवढया पुरतेच असते.
पण कल्पना करा कि हि कविता पावसाच्या प्रेमात पडली आणि पावसानेही तिला प्रतिसाद दिला तर? कल्पना तर रोमॅटिक आहे न? पण मग कसे असेल त्यांचे हे नाते? आणि काय होईल त्यांच्या या प्रेमकहाणीचे?
याच नात्याचा काव्यमय आणि संगीतमय प्रवास म्हणजे सुरभी निर्मित "एक पाऊस कधीचा".
कविता आणि पावसाचे प्रेमात पडणे, प्रथम अव्यक्त पण नंतर ऐका टप्प्यावर एकमेकांकडे व्यक्त होणे, नंतरचा अपरिहार्य दुरावा आणि पुन्हा पुनर्मिलन असा हा त्यांचा नात्याचा प्रवास त्यातील कंगो-यांसह संहितेत अप्रतिम पणे शब्दबद्ध केला आहे स्पृहा जोशी हिने. तर हा अनुभव काव्यमय आणि संगीतमय झाला आहे तरूण संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी संगीतबध्द केलेल्या अनेक मात्तबर कवींच्या कवीतांनी.
आलाप भागवत, यशोदा बुधकर यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकर, शांता शेळके, सदानंद डबीर, ना धो महानोर, स्पृहा जोशी यांच्या कवितेतून आणि स्पृहा जोशी व सुबोध खानोलकर यांच्या निवेदनातुन हि आगळी वेगळी प्रेमकहाणी आपल्यापुढे साकारत जाते. अतिशय सुंदर संहिता, सुरेख निवेदन अप्रतिम गायन आणि संगीत याने नटलेला हा कार्यक्रम एकदा तरी अनुभवावा.
या कार्यक्रच्या निमित्ताने प्रकर्षाने आठवण झाली ती आणखी ऐका कलाकृतीची. ती म्हणजे विक्रम भागवत लिखित "ऐक लफडे न विसरता येणारे" या नाटकाची. या नाटकाचा उल्लेख मुद्दाम करण्याचा उद्देश या दोन कलाकृतीत तुलना करण्याचा अजिबात नाही. पण त्यातील साम्यस्थळे व शक्तीस्थळे शोधण्याचा एक प्रयत्न.
या दोन्ही कलाकृतींचे कल्पनाबीज तसे साधारण एकच. दोन्हींचा प्रवास प्रेम - विरह - पूर्नभेट असाच असला तरी प्रवासाच्या वाटा मात्र वेगळ्या. या वाटेवर विक्रम भागवतांना भेटली दोन मानवी पात्रे रंगा आणि मनस्विनी त्यांच्या स्वभावविशेष व गुणा-अवगुणांसकट. त्याच्या नातेसबंधांचा वेध घेत भागवतांनी हा प्रवास नाट्यमय केला तर स्पृहाने पाऊस आणि कविता हि अशरीर प्रतीके घेत काव्यमय व संगीतमय प्रवास घडविला. दोन्हींमध्ये तीच उत्कटता, आणि तोच अपरिहार्य विरह. पण अनुभूती मात्र वेगवेगळी. नाटकात मानवी विकारांसह शारीर पातळीवर जाणारी तर एक पाऊस कधीचा मध्ये प्रतिकांमधुन मानवी विकारांचा आभास निर्माण करणारी.
नाटकातील मानवी पात्रांचा प्रवास त्यांच्या प्रारब्धानुसार नियतीने ठरविलेला तर "एक पाऊस कधीचा" मध्ये तो निसर्गनियमाने ऋतुचक्रात बांधलेला. पण दोन्ही कलाकृती अत्यंत तरल अनुभव देणा-या . एकाच कल्पनेवर
दोन ताकदीचे कलाकार (एक लेखक तर एक कवियत्री) दोन वेगवेगळ्या फॉर्मसं मधे अत्यंत सुंदर कलाकृती कशा साकारू शकतात याचे हे सुरेख उदाहरण. एकाच कल्पनेचे हे दोन अप्रतिम अविष्कार.
असो. हे झाले संहितेबद्दल. आता थोडे सादरीकरणा बद्दल. आलाप, यशोदा, मयुरेश, स्पृहा, आणि सुबोध या सर्व मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आलाप - यशोदा - मयुरेश या त्रवीनी आपली ताकद "एक लफडे" च्या निमित्ताने यापूर्वीच दाखविली आहे. एक पाऊस मधे त्यांना मिळालेल्या संधीचे त्यानी सोने केले आहे. यातील प्रत्येक गीत त्यानी जबरदस्त ताकदीनी सादर केली आहेतच पण प्रत्येकानी किमान दोन गाण्यांवर आपली मोहोर उठविली आहे.
मयुरेशचे संगीत हा या कार्यक्रमाचा प्लस पांईंट ठरला आहे. या निमित्ताने मात्तबर कविंच्या कधीही संगीतबद्ध न झालेल्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतात. त्या बद्दल मयुरेशचे विशेष अभिनंदन करावयास हवे. संपूर्ण कार्यक्रमात एकच परिचित गाणे आहे ते म्हणजे "पाऊस आला वारा आला". पण तेही पूर्णपणे नवीन चाल घेऊन.
स्पृहाने यापूर्वी अभिनेत्री म्हणून आंतरमहाविद्यालय स्पर्धेपासूनच आपले वेगळेपण दाखविले आहे. आता एक पाऊस कधीचा मधून ती कवियत्री, लेखिका, आणि निवेदिका म्हणून आपली छाप पांडली आहे यात शंकाच नाही. तिला निवेदनात सुबोधने सुरेख साथ दिली आहे.
असा कार्यक्रम सादर करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल निर्माता म्हणून आलापचे विशेष कौतुक करायला हवे. परिचित आणि त्यातही खास करून लोकप्रिय गाणी सादर करणारे मराठी वाद्यवृंद शेकड्यानी आहेत. पण उत्तोमोत्तम कविता निवडून त्या एका विशिष्ठ सूत्रात गुंफत त्या खास संगीतबध्द करून त्याचा नजराणा रसिकांना देण्याचा धाडसी प्रयोग "एक पाऊस कधीचा" मधे त्याने केल्याबद्दल आलाप्चे कौतुक आणि अभिनंदन.
हा प्रयोग करण्यासाठी त्याला साथ द्यायला टीम सुध्दा जबरदस्त मिळाली आहे हे त्याचे भाग्याच म्हणावे लागेल. कविता आणि पाऊस यांच्या प्रेमाकाहाणीची संकल्पना शब्दबध्द करणारी लेखिका स्पृहा, तसेच हि संकल्पना निवेदनातून सादर करणारे निवेदक स्पृहा आणि सुबोध, या सर्व कवितांना संगीतसाज चढविणारा गुणी संगीतकार मयुरेश, आणि गायक म्हणून यशोदा व स्वत: आलाप. एक मस्त टीम जमली आहे. या धाडसी टीमला सर्व काव्याप्रेमी रसिकांनी भरभरून पाठिंबा द्यावा.

एक कविता पावसाची.....
एक पाऊस कवितेचा.....
एक प्रवास त्यांच्या प्रेम कहाणीचा....
एक पाऊस कधीचा......
------------------------------------------------------------------------------------------------------
काहीतरी फोन्टचा प्रॉब्लेम आहे. जरा गुगलचा मराठी वापरून बघ !! बाकी तुमचा मनाशी संवादू जनाशी करण्याचा उपक्रम स्तुत्य !!! आम्ही तुमच्या संवादात सहभागी आहोत
ReplyDeleteकळावे लोभ असावा -----------
धन्यावाद अतुल. फाँट सुधारून पुन्हा पोस्ट केला आहे. जर काही प्रोब्लेम वाटला तर जरूर कळव.
ReplyDeleteलोभ आहेच. वृध्दिंगत व्हावा.....