हुश्श !!! अखेर भारतीय अर्थव्यवस्थेच्या ढासळण्याचे आणि रुपयाच्या अवमुल्यानाचे नेमके कारण सापडले. सामान्य जनतेपासून सरकार पर्यंत अर्थव्यवस्थेच्या काळजीने चिंतीत होतेच (अगदी अर्थमंत्री स्वतः काळजीचे कारण नाही असे बाईट सर्व channel वर जरी देत असले तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसून येतेच.). सरकारने सर्व पातळीवर उपाययोजना करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा उपाय काही सापडत नव्हता. आणि सापडणार तरी कसा?
अशा अत्यंत कठीण
परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी अत्यंत सक्षम आणि बुद्धिमान तज्ञ मंडळी सरकारकडे हवीत
कि नाही? पण सरकार काय अथवा रिझर्व बँकेकडे काय खोगीरभारती कोणाची आहे तर IIM, London School of
Economics, अथवा गेलाबाजार IIT सारख्या सुमार संस्थेतून शिक्षण
घेऊन स्वताला तज्ञ समजणाऱ्या मंडळींची. बर या मंडळींचे शिक्षण कशात तर
अर्थशास्त्र, पदार्थाविज्ञान, माहितीतंत्रज्ञान अशा फुटकळ विषयात. अशा कालबाह्य
झालेल्या विषयात चार धुळाक्षरे गिरवून तज्ञ म्हणून मिरवणाऱ्या मंडळीना का हि
समस्या सुटणार? बरे, हि अशी मंडळीही संख्येने अगदी मोजकीच (म्हणूनच फावते बहुतेक
या लोकांचे.)
पण अशी जटील समस्या सोडवण्यासाठी तशीच मात्तब्बर आणि विद्द्वान मंडळी हवीत हे
सरकारला कधी उमजणार? त्यासाठी हवीत ज्योतिषशास्त्र(?), वास्तुशास्त्र (?) अशा
अतिआधुनिक विषयात पारंगत असलेली तज्ञ मंडळी. बरे, यांची सख्याही आजकाल बरीच आहे (अहो एकेका
गल्लीत ५-६ तज्ञ आहेत.
बघा, जे IIM, अथवा London School of
Economics मधे फुटकळ शिक्षण घेऊन आलेल्या आणि स्वताला तज्ञ मंडळीना जे जमले नाही ते
वास्तुशास्त्रा सारख्या अत्याधुनिक शास्त्रात पारंगत असलेल्या एका विद्वान
व्यक्तींने केले.
गोहत्तीस्थित एका वास्तुतज्ञांने
रुपयाच्या अवामुल्यानाचे नेमके करणा शोधून त्यावर उपायसुद्धा सुचवला आहे. तोही
अगदी सोपा. बघा आम्ही म्हणत नव्हतो कि IIM, London School of
Economics मधे शिकलेल्या येऱ्या-गबाळांचे हे काम नोहे.
या सगळ्या समस्येसं कारण
आहे ते रुपयाचे नवीन चिन्ह ! या वास्तुतज्ञांच्या मते हे अपवित्र (An inauspicious symbol) चिन्हचं रुपयाच्या आणि
भारतीय अर्थव्यवस्थेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे (स्त्रोत : Hindustan Times 31st May 2012, page 10).
कारण या चीन्हातील खालची
आडवी रेघ रुपयाचा (आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेचा) गळा घोटते आहे म्हणे! बघा
बघा... एवढे सोप्पे कारण पण नाही न मिळाले त्या तुमच्या IIT, IIM, अथवा London School of
Economics मधील विद्वानांना....
या वास्तुतज्ञांनी पुरावे तरी किती भक्कम दिलेत म्हणता? अहो हे चिन्ह (चिन्ह
कसले, “अवचिन्हचं” ते !) नसताना २००९ च्या जागतिक अर्थासंकटातून आपण सहीसलामत सुटलोच कि नाही?
पण २०१० मधे हे चिन्ह स्वीकारले गेले आणि गेल्या जानेवारी पासून ते अमलात आणले
गेले (अगदी नोटांवर छापले गेले) आणि तिथूनच अर्थाव्यवस्था ढासळायला सुरवात झाली ना...
आणखी कसला पुरावा हवा?
या चिन्हाची (कसले, अवचिन्हाची)
माहिती काढली तर असे कळले कि सदर चिन्ह हे D Udayakumar या IIT मधील प्राध्यापकाने डिझाईन केले आहे. (बघा बघा !!! हि व्यक्ती कोण तर IIT मधलीच....
हा काय योगायोग म्हणायचा? आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो कि हे IIt IIMवाले.....
पण लक्षात कोण घेतो?)
आता तरी सरकारने शहाणे होऊन या IIT, IIM अशा सुमार संस्थांमधील अर्थशास्त्र,
पदार्थाविज्ञान, माहितीतंत्रज्ञान अशा कालबाह्य विषयातील तथाकथित विद्वानांना
बाजूला सारून या देशातील ज्योतिष, वास्तुशास्त्र, अशा अत्याधुनिक विषयातील तज्ञ
मंडळींची समिती नेमून एकूणच देशाच्या विदारक स्थितीची नेमकी करणे व उपाय सुचवण्यास
सांगावे.
अर्थात समितीचा अहवाल हा आमच्या अटकळीप्रमाणेच असेल यात आम्हाला तिळमात्र शंका
नाही. वानगी दाखल काही उदाहरणे अशी –
१) देशाच्या राष्ट्रध्वजाचा
आकार, रंग (विशेषतः हिरवा) आणि त्यावरील चिन्ह हि देशास व देशाच्या ढासळत्या
परिस्थितीस कारणीभूत आहेत. देशाच्या कुंडलीचा विचार करता भगवा रंग हा "भाग्य-रंग"
ठरावा. तसेच ध्वजाचा त्रिकोणसदृश्य आकार देशाच्या भाग्योदायास कारणीभूत ठरेल.
२) अमुक-तमुक
शास्त्राप्रमाणे देशाचे “भ” या आद्याक्षरावरून सुरु होणारे नाव देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आसून “हि” या आद्याक्षार्पासून सुरु
होणारे अनुनासिक नाव देशास प्रगतीपथावर नेईल.
आम्हास खात्री आहे कि हि समिती राष्ट्राध्वजापासून
राष्ट्रगीता पर्यंत अनेक उपाय सुचवून देशात “क्रांती”कारक बदल घडवून आणेल.
असो! आता काही नतद्रष्ट मंडळी अशी शंका काढतात कि जर एक
आडवी रेघ रुपयाचा गळा घोटते तर डॉलर् मधल्या उभ्या रेषेने आतापर्यंत डॉलरला उभे का
चिरले नाही? पौंडाच्या पोटात खुपसलेल्या आडव्या रेषेने पौंडाचा कोथळा बाहेर का
काढीला नाही?
(नतद्रष्टनो, भलत्या शंका काढण्याचे काम नाही. ज्योतिष,
वास्तुशास्त्र, अशा अत्याधुनिक शास्त्रात सगळ्या प्रश्नांना उत्तरे नसतात कारण ती “शास्त्र” आहेत. कळले!!!!)

Fantastic! लगे रहो!!
ReplyDeleteThanks Avidada.
ReplyDeleteu cant completely blame d new rupee sign for it...
ReplyDeletei just read d article... bt sum hw its nt satisfying enough ...
Kaka Bhari re..... Are jyala marathi bhasha samzat nahi asha saglyana pan tu mail takla vatte. Superb.... Lihale ahe ajun lihi tya baddal.
ReplyDeleteJayantrao, zakas!! Mera Bharat Mahan.
ReplyDelete;-) Thanks Rajesh
ReplyDeleteजयंतजी,
ReplyDeleteधागा आवडला.